विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकासआघाडीतच फोडाफोडी? आमदार किशोर जोरगेवार म्हणतात…
अपक्ष आमदार किशोर जोगरेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी ठाकरे सरकारचे तोंडभरून कौतुक केले आहे. आघाडी सरकार अपक्ष आमदारांची कामं पूर्ण करीत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. विरोधी पक्ष न झालेल्या कामाबद्दल नेहमीच आवाज उठवत असतो, पण महाविकासआघाडी सरकार जनतेचे आणि आमदारांचेही काम करीत असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले. आमदार जोरगेवार मुंबईत मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी […]
अपक्ष आमदार किशोर जोगरेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी ठाकरे सरकारचे तोंडभरून कौतुक केले आहे. आघाडी सरकार अपक्ष आमदारांची कामं पूर्ण करीत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. विरोधी पक्ष न झालेल्या कामाबद्दल नेहमीच आवाज उठवत असतो, पण महाविकासआघाडी सरकार जनतेचे आणि आमदारांचेही काम करीत असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले. आमदार जोरगेवार मुंबईत मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ठाकरे सरकारसमोरची आव्हाने वाढली आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला सुरवात झाली असल्याची चर्चा आहे.
Published on: Jun 17, 2022 02:49 PM
