Ganeshotsav 2025 : गणेशभक्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय… गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे पैसे वाचणार, कारण…

Ganeshotsav 2025 : गणेशभक्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय… गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे पैसे वाचणार, कारण…

| Updated on: Aug 21, 2025 | 9:14 PM

महाराष्ट्रातील गणेशोत्सवासंदर्भात एक चांगली बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफी जाहीर केली आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने राज्यभरात गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात दरवर्षी साजरा केला जातो. अशातच कोकणातील गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गणेशोत्सवाच्या काळात टोलमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येणाऱ्या 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून तुम्ही प्रवास करणार असला तर प्रत्येक टोल नाक्यांवर टोलमाफ होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसला लागू असणार आहे.

Published on: Aug 21, 2025 09:14 PM