BMC Election: भाजप अन् शिवसेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटे 4 पर्यंत मॅरेथॉन बैठक, काय झाली खलबतं?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये 200 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित 27 जागांवर चर्चा सुरू असून, महायुतीचा महापौर बसवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच याबाबत अंतिम घोषणा करणार आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये 200 जागांवर एकमत झाले असून, उर्वरित 27 जागांवर अद्याप रस्सीखेच कायम आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या जागावाटपावर चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटपाचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांत उमेदवारांची निश्चिती केली जाईल असे सांगण्यात आले आहे. महायुती 227 जागांवर एकत्रितपणे लढणार असून, 150 हून अधिक जागा जिंकून मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
