Malegaon Bomb Blast 2008 : खटल्याची केस शेवटपर्यंत लढणारे म्हणाले, डोळ्यात धूळ टाकणारा निकाल, आता आम्ही…

Malegaon Bomb Blast 2008 : खटल्याची केस शेवटपर्यंत लढणारे म्हणाले, डोळ्यात धूळ टाकणारा निकाल, आता आम्ही…

| Updated on: Jul 31, 2025 | 1:08 PM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. मात्र 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची केस ज्यांनी शेवटपर्यंत लढली ते जमात-ए-उलेमाचा जिल्हाध्यक्ष कासिम यांनी मुंबईतील राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात या प्रकरणी जाहीर झालेल्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज आलेला निकाल हा डोळ्यात धूळ फेकणारा असा आहे. एवढा मोठा स्फोट झाला. 6 लोक शहीद तर 100 लोक जखमी झाले. लोकांना याचा मोठा धक्का बसला. इतकंच नाहीतर हेमंत करकरे यांनी एवढी मेहनत घेऊन या लोकांना ताब्यात घेतलं त्याचे पुरावे गोळा केले आणि एवढं सगळं असताना या प्रकरणातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे हे समजण्यापलीकडे असल्याचे मत कासिम यांनी व्यक्त केले. पुढे कासिम असेही म्हणाले, आम्ही न्याय मागण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार आणि आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे.

Published on: Jul 31, 2025 01:08 PM