Malegaon Bomb Blast 2008 : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष,17 वर्षांनंतर निकाल अन्..

Malegaon Bomb Blast 2008 : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष,17 वर्षांनंतर निकाल अन्..

| Updated on: Jul 31, 2025 | 11:47 AM

29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्फोटची घटना घडली. यामध्ये 6 मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 100 हून अधिक गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज जाहीर झालाय. मुंबईतील राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणाची सुनावणी 17 वर्षांनंतर पूर्ण झाली असून, न्यायालयाने निकाल सुरक्षित ठेवला होता अखेर आज तो जाहीर केलाय. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) आणि त्यानंतर एनआयएकडे सोपवण्यात आला होता. आरोपींवर विविध कलमांतर्गत आरोप ठरवण्यात आले होते. मात्र आज झालेल्या कोर्टाच्या निकालात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Published on: Jul 31, 2025 11:44 AM