मालेगाव चिमुरडी अत्याचार! आरोपीला कोर्टात हजर करताना नागरिकांचा संताप आणि गोंधळ

मालेगाव चिमुरडी अत्याचार! आरोपीला कोर्टात हजर करताना नागरिकांचा संताप आणि गोंधळ

| Updated on: Nov 20, 2025 | 5:17 PM

मालेगावमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची मागणी करत जोरदार निदर्शने केली. आरोपीला कोर्टात हजर करत असताना नागरिकांनी रस्तारोको केला, ज्यामुळे कोर्टाबाहेर तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. सध्या आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मालेगावमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मालेगाव कॅम्प रोड परिसरात संतप्त नागरिकांनी रस्तारोको करत जोरदार घोषणाबाजी केली. चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयाच्या आवारात आणि कोर्टाबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांनी आरोपीला घेऊन येणारा रस्ता अडवला. संतप्त महिलांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीला कोर्टात हजर केले जात असताना हा गोंधळ उडाला. सध्या, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सादर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Nov 20, 2025 05:17 PM