Manikrao Kokate : राजीनामा देण्यासारखं मी केलयं तरी काय? कोकाटेंचा उलट प्रश्न
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत रमीच्या व्हिडीओवर भाष्य केलं आहे.
राजीनामा देण्यासारखं घडलं काय. मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय. ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. विधान भवनाच्या सभागृहात रमी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठली आहे. त्यावरून आज पत्रकार परिषदेत मंत्री कोकाटे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मी ब्रिफ केलं नाही. त्यांना मी भेटलो नाही. त्यांनी मीडिया रिपोर्टवर प्रतिक्रिया दिली आहे. मी २५ वर्ष विधानसभेत आहे. मला विधानसभेचे नियम माहीत आहे. पण काही लोकांनी अनावश्यक विषय लावून धरला आहे. अँड्राईड मोबाईल आहे. फायजी आहे. काही टच झालं तर भलतंच काही तरी दिसतं. स्किप करेपर्यंत माझा दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल, असं स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिलं.
