म्हणून राजीनामा घेणं किती योग्य? राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा प्रश्न; कोकाटेंना कोणाचं अभय

म्हणून राजीनामा घेणं किती योग्य? राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा प्रश्न; कोकाटेंना कोणाचं अभय

| Updated on: Jul 23, 2025 | 12:50 PM

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अभय मिळत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अभय दिला जातोय का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीमधल्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. कोकाटे यांच्या कृतीचा निषेध मात्र राजीनामा घेतला जाणार नाही, असं या वरिष्ठ नेत्याने म्हंटलं आहे. हल्ली प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे, असं देखील मत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केलं आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत.

मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनाच्या सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर काल कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलेलं असून कोकाटे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अभय दिला जातोय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Published on: Jul 23, 2025 12:50 PM