Dada Garad : जरांगेंच्या हत्येचा कट, आरोपी दादा गरडचा Video व्हायरल, 20 कोटींची कोणाला ऑफर? केला मोठा दावा!
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या निषेधार्थ बीडमधील शिरुर कासार तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी दादा गरड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या निषेधार्थ आणि संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणी पोलीस प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले आहे. या कटाशी संबंधित असलेल्या दादा गरड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्यांनी धनंजय देशमुख यांना 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, टीव्ही 9 मराठी या व्हिडिओची सत्यता पडताळत नाही.
Published on: Nov 10, 2025 11:46 AM
