Manoj Jarange Patil : अररररर… मै ऐसा बोलुंगा हिंदी का खेळ हो जाएगा, पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर जरांगे बघा काय म्हणाले?

Manoj Jarange Patil : अररररर… मै ऐसा बोलुंगा हिंदी का खेळ हो जाएगा, पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर जरांगे बघा काय म्हणाले?

| Updated on: Aug 30, 2025 | 4:56 PM

'बलिदान दिलेल्या लोकांशी खेळता. मी एक मिनिटंही देणार नाही. दोन महिने देणार होतो. आता तेही देत नाही. बलिदान देणाऱ्यांना नोकरी देत नाही आणि निधीही देत नाही. आमदारांच्या सभेला कोटी रुपये उधळता.', जरांगे पाटलांचा हल्लाबोल

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आज निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. यासंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, शिंदे समिती येणं अपेक्षित नव्हतं. शिंदे समितीला विनाकारण पुढे घालत आहे. आम्ही सांगितलं की सातारा गॅझिटिअरचा सर्व मराठा कुणबी आहे. हैद्राबादच्या गॅझिटेरिअरचा मराठाही कुणबी आहे. त्याची अंमलबजावणी हवी. एक घंटा वेळ देणार नाही. सगे सोयऱ्यांच्याबाबतही तडजोड नाही. मराठा आणि कुणबी एक आहे. ५८ लाख नोंदीचा आधार आहे. जीआर काढा. त्यासाठी ते चर्चा करतो म्हणाले.

तर शिंदे समितीचा विषय आणि केसेसवर कोणतीही तडजोड नाही. मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी आहे. सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठाही कुणबी आहे. त्यांना औंध आणि मुंबई गव्हर्नेमेंटसाठी त्यांना वेळ हवा. आपण त्यांना वेळ दिला. पण बाकीच्या गोष्टीसाठी वेळ नाही, असेही त्यांनी म्हटले. यावरच एका हिंदी पत्रकाराने सवाल केला असता जरांगेंनी उत्तर देणं टाळलं, बघा काय म्हणाले?

Published on: Aug 30, 2025 04:56 PM