Maratha Reservation Rally : आरक्षणासाठी जरांगे आझाद मैदानात… बेमुदत आंदोलनावर ठाम, आणखी 1 दिवस परवनागी

Maratha Reservation Rally : आरक्षणासाठी जरांगे आझाद मैदानात… बेमुदत आंदोलनावर ठाम, आणखी 1 दिवस परवनागी

| Updated on: Aug 30, 2025 | 11:08 AM

मुंबईमध्ये आजाद मैदानात जरांगे पाटलांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली होती. पण जरांगे मैदानातून हटणार नाही यावर ते ठाम राहिले आणि पुन्हा एका दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे आरक्षण घेतल्याशिवाय मागार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे.

ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने जरांगे पाटलांसोबत मराठा आंदोलन मुंबईत दाखल झालेत. पोलिसांनी एकाच दिवसाची परवानगी दिली होती पण आता आणखी एका दिवसाची परवानगी वाढवून देण्यात आलीये तर बेमुदत उपोषणाची परवानगी द्या, मागण्या मान्य होईपर्यंत जागा सोडणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केलाय. दरम्यान, काल आंदोलनाची हाक दिल्यानंतर  ३००० हून अधिक गाड्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल झाला आहे त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही झाली आहे आजाद मैदानाचा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये ही मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. त्यामुळे आंदोलनावर तात्काळ मार्ग काढण्याचा आवाहन सरकार समोर आहे. दरम्यान, संविधानात बसणारा उपाय शोधाव लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. तर दुसरीकडे एका महिन्याचं धान्य पुरेल एवढं रेशन घेऊन मराठे मुंबईत आले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मागार नाही, असा निर्धार या सर्व मराठा आंदोलकांनी केला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 30, 2025 11:04 AM