Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील ‘या’ 6 मागण्यांसाठी पुन्हा एकदा मुंबईत धडकणार, सरकार मागण्या मान्य करणार?
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला असून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत सरकार उलथून टाकण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत मुंबईत बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. जर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकार उलथून टाकणार अशी थेट धमकीही त्यांनी दिली आहे. जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिंदे समितीची नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेणे, हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करणे, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, सगळे सोयऱ्यांची अमलबजावणी करणे आणि संविधानत बसणारे आरक्षण देणे अशा मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Published on: Aug 25, 2025 05:12 PM
