Maratha Reservation Rally :  जिथं नजर जाईल तिथं भगवा, मुंबई गाठा… जरांगेंच्या आवाहनानंतर मराठा आंदोलकांची तोबा गर्दी अन्..

Maratha Reservation Rally : जिथं नजर जाईल तिथं भगवा, मुंबई गाठा… जरांगेंच्या आवाहनानंतर मराठा आंदोलकांची तोबा गर्दी अन्..

| Updated on: Aug 29, 2025 | 10:20 AM

मनोज जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह मुंबईत दाखल झाले असून थोड्याच वेळात ते आझाद मैदानात येऊन मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत.

ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण कऱणार आहेत. तब्बल हजारो किलमोटीरचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते, मराठा बांधव देखील हजर होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना मुंबई गाठा असे आवाहन दिले. या आवाहनानंतर मुंबईत पाच हजार गाड्यांच्या ताफ्यासह मराठे बांधव मुंबईत धडकले जिकडे नजर जाईल तिकडे फक्त मराठे.. मराठे आणि भगवं वादळ सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.

Published on: Aug 29, 2025 09:54 AM