Manoj Jarange Patil : …तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण नेमकं काय?

Manoj Jarange Patil : …तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Dec 16, 2025 | 3:26 PM

मनोज जरांगे पाटील यांनी शौर्य पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन न्याय मिळण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करत दोषींना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा दिल्लीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही याचा परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मृत शौर्य पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभाग घेतला. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी शौर्य पाटील प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जर अमित शहा यांनी या प्रकरणी लक्ष दिले नाही, तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा अपमान होईल आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनीही या प्रकरणात अमित शहांना कारवाईसाठी सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, जर न्याय मिळाला नाही, तर शौर्य पाटील यांच्यासाठी दिल्लीत मोठे आंदोलन छेडण्यात येईल. या प्रकरणात राजकारण करायचे नसून, फक्त न्याय मिळवणे हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Dec 16, 2025 03:26 PM