Ram Jadhav | सोलापुरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन; CM फडणवीस यांना रक्ताने पत्र
सोलापूर महापौर निवडीवरून भाजपने मराठा समाजावर अन्याय केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन छेडले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राम जाधव यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून निषेध नोंदविण्यात आला आहे.
सोलापूर महापौर निवडीवरून भाजपने मराठा समाजावर अन्याय केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन छेडले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राम जाधव यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच या निर्णयाच्या निषेधार्थ मुंडन आंदोलनही करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्षरवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 32 वर्षांपासून विविध राजकीय पक्षांनी सर्व समाजघटकांना संधी दिली असल्याचा दावा करत, 1993 नंतर पहिल्यांदाच मराठा समाजावर अन्याय झाल्याचा आरोप जाधव यांनी केला. यंदा जागा सर्वसाधारण असतानाही भाजपने आपला उमेदवार महापौरपदी निवडून आणत मराठा समाजाला डावलल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने मतपेटीतून आपली भूमिका स्पष्ट केली असून, विधानसभेतही मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत येणे शक्य झाले, असा दावा करत या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राम जाधव यांनी केली.
