Maratha Protest : जरांगेंच्या भेटीनंतर मराठ्यांनी सुळेंना घेरलं, कारपर्यंत पोहोचताना दमछाक तरीही चेहऱ्यावर हास्य
सुप्रिया सुळेंच्या कारवर आंदोलकांनी बॉटल भिरकावल्यानंतरही आंदोलकांना सुप्रिया सुळे हसतमुखाने सामोरे गेल्या, बघा आझाद मैदानात नेमकं काय घडलं?
काहीही झालं तरी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून मराठा समजाला आरक्षण मिळवून देणार असा निर्धार व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडलंय. अवघ्या गणेशोत्सवाच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलकांसह मुंबईत धडकले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर यंत्रणेवर त्राण येत असल्याचे पाहायला मिळतंय. गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या आंदोलनाला तिसरा दिवस आहे. आज सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट आंदोलनस्थळी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र ही भेट झाल्यानंतर बाहेर निघताना सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. दरम्यान, यावेळी शरद पवारांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर सुप्रिया सुळेंना आपल्या कारपर्यंत पोहोचत असताना मराठा आंदोलकांनी घेरलं. आंदोलकांच्या मोठ्या गराड्यातून वाट काढताना सुप्रिया सुळेंची चांगलीच दमछाक झाली.
