नैतिक जबाबदारी म्हणून मी काल…; आंदोलकांनी घातलेल्या घेरावावर सुळेंची मोठी प्रतिक्रिया

नैतिक जबाबदारी म्हणून मी काल…; आंदोलकांनी घातलेल्या घेरावावर सुळेंची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Sep 01, 2025 | 12:25 PM

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली आणि जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार यांनाही जबाबदार धरले गेले. सुळे यांनी या घटनेला "स्वाभाविक" म्हटले, तर राज्य सरकारकडून स्वच्छतेची मागणी केली.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, परंतु या भेटीनंतर त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलनस्थळी काही मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवार यांच्यावर मराठा समाजाचे नुकसान केल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे, तर सुळे यांना गाडीत बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या.

या घटनेवर पुण्यातून पहिली प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “इतके मोठे आंदोलन सुरू आहे, अशा वेळी काही अनुचित घटना घडणे स्वाभाविक आहे. तरुण मुलांच्या मनात भावना असतात. माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी काल तिथे गेले. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खराब होती, त्यामुळे मी त्यांची भेट घेतली आणि थोडक्यात चर्चा केली.” त्या पुढे म्हणाल्या, “राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला माझी विनंती आहे की, आंदोलनस्थळी स्वच्छतेची काळजी घ्यावी.”

Published on: Sep 01, 2025 12:24 PM