राजधानी दिल्लीत आजपासून मास्कसक्ती, मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड

राजधानी दिल्लीत आजपासून मास्कसक्ती, मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड

| Edited By: | Updated on: Apr 20, 2022 | 1:54 PM

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे सतत कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये कोरोनाचे काही निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे सतत कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये कोरोनाचे काही निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये मास्क (Mask) लावण्याची सक्ती केली जाऊ शकते. जर एखाद्या व्यकीने मास्क वापरले नाही तर त्याला 500 रूपयांचा दंड देखील आकारला जाऊ शकतो. कोरोना (Corona) संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलली जाऊ शकतात.