मातोश्रीवर नजर ठेवण्याचे प्रयत्न? आदित्य ठाकरेंच्या ट्विटची चर्चा

मातोश्रीवर नजर ठेवण्याचे प्रयत्न? आदित्य ठाकरेंच्या ट्विटची चर्चा

| Updated on: Nov 09, 2025 | 3:01 PM

मातोश्री निवासस्थानाजवळ ड्रोन उडवल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी बीकेसी सर्वेक्षणासाठी परवानगी दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, यावर आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ड्रोन उडवण्यामागील हेतू आणि रहिवाशांना माहिती न दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, एमएमआरडीएच्या कामावरही ताशेरे ओढले आहेत.

मुंबईतील मातोश्री परिसरात ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे की, बीकेसी परिसरातील सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवण्याची परवानगी देण्यात आली होती.

मात्र, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी या संदर्भात ट्वीट करत म्हटले आहे की, “आज सकाळी आमच्या निवासस्थानी एक ड्रोन सापडला. जेव्हा मीडियाला या संदर्भात कळले, तेव्हा असे म्हटले जात आहे की बीकेसीसाठी मुंबई पोलिसांच्या परवानगीने सर्वेक्षणासाठी हे होते.”

ठाकरे यांनी पुढे विचारले आहे की, “कोणते सर्वेक्षण घरांमध्ये डोकवण्याची आणि पाहिले गेल्यावर त्वरित उडून जाण्याची परवानगी देते? रहिवाशांना का सूचित केले गेले नाही? एमएमआरडीए (MMRDA) फक्त आमच्या घराची संपूर्ण बीकेसीसाठी निगराणी करत आहे का?” त्यांनी एमएमआरडीएला त्यांच्या कामातील ढोंगीपणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, जसे की एमटीएचएल अटल सेतू, जे त्यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. या घटनेमुळे मातोश्री परिसरातील सुरक्षेचा प्रश्न आणि गोपनीयतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Published on: Nov 09, 2025 03:01 PM