Mahakumbh Stampede Video : प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 10 हून अधिकांचा मृत्यू तर अनेक जखमी; नेमकं काय घडलं?

Mahakumbh Stampede Video : प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 10 हून अधिकांचा मृत्यू तर अनेक जखमी; नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 29, 2025 | 1:39 PM

मौनी अमावस्या शाही स्नानाचा दिवस असल्याने अमृत स्नानासाठी महाकुंभ मेळ्यादरम्यान संगम तीरावर भाविकांची मोठी गर्दी होत असते. प्रयागराजमध्ये अजूनही सुमारे ८ ते १० कोटी भाविक आहेत. या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. आज मौनी अमावस्येच्या निमित्ताने बुधवारी सकाळी महाकुंभात अमृत स्नानासाठी गर्दी वाढल्याने ही चेंगराचेंगरी झाली. मौनी अमावस्या शाही स्नानाचा दिवस असल्याने अमृत स्नानासाठी महाकुंभ मेळ्यादरम्यान संगम तीरावर भाविकांची मोठी गर्दी होत असते. प्रयागराजमध्ये अजूनही सुमारे ८ ते १० कोटी भाविक आहेत. या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, चेंगराचेंगरीनंतर आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे. महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सकाळपासून तीन ते चार वेळा मुख्यमंत्री योगी यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना तात्काळ उपचार देण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत. तर अमित शहा आणि जेपी नड्डा देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, आज सकाळी महाकुंभातील आखाड्यांचे अमृत स्नान बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, महाकुंभात सकाळी ६ वाजेपर्यंत १.७५ कोटी लोकांनी संगम तीरावर स्नान केल्याची माहिती आहे.

Published on: Jan 29, 2025 01:31 PM