जन आशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद देणार नाहीत, तेच त्रासले आहेत

| Updated on: Aug 18, 2021 | 9:14 PM

विमानतळाहून ही जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. मात्र कोविड 19 काळात ही जन आशिर्वाद यात्रा म्हणता येणार नाही. ते आशिर्वाद देणार नाहीत, तेच त्रासले आहेत, त्यामुळे ही जन छळवणूक यात्रा आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

Follow us on

YouTube video player

मुंबई: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी नारायण राणे शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार आहेत. राणे पहिल्यांदाच स्मृती स्थळावर येणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेला शह देण्यासाठीच राणेंची ही खेळी असल्याचीही जोरदार चर्चा आहे. येत्या 19 ऑगस्टपासून नारायण राणेंची जन आशीर्वाद रॅली सुरू होणार आहे. त्याच दिवशी ते दिल्लीतून मुंबईत येणार आहेत. विमानतळाहून ही जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. मात्र कोविड 19 काळात ही जन आशिर्वाद यात्रा म्हणता येणार नाही. ते आशिर्वाद देणार नाहीत, तेच त्रासले आहेत, त्यामुळे ही जन छळवणूक यात्रा आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.