Nonveg Ban on 15 Aug : स्वातंत्र्यदिनी नॉनव्हेज बॅन? कल्याण पालिकेच्या अजब आदेशाची चर्चा, इतिहासात पहिल्यांदाच निर्णय
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवली महापालिकेनं घेतलेला एक निर्णय वादात आलाय. त्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला अटक करण्याच आव्हान दिलेलं आहे.
इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनानिमित्त चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घातली गेलीये. कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा अजब निर्णय घेतलाय. स्वातंत्र्य दिनानिमित्त 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांसह सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेत. या आदेशाला विरोध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. अनेक वर्षांपासून न झालेले महापालिका निवडणुकांमुळे रस्ते आणि खड्ड्यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र मुंबईत आधी हिंदी भाषा धोरणावरून हिंदी विरुद्ध मराठी त्यानंतर कबुतर आणि आता चिकन मटणाचा हा वाद सुरू झालाय. अशाच लोकांशी निगडित असलेले मूलभूत आणि अत्यावश्यक असे कोणकोणते वाद आता भविष्यात येतात हे फक्त पाहत राहणार पलीकडे मुंबईकरांच्या हाती दुसरा तरी काय आहे.
