मनसेचे वसंत मोरे पुन्हा नाराज? शरद पवार यांच्या सोबतच्या भेटीचं कारण काय?

मनसेचे वसंत मोरे पुन्हा नाराज? शरद पवार यांच्या सोबतच्या भेटीचं कारण काय?

| Updated on: Feb 28, 2024 | 1:03 PM

बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य लढतीत शरद पवार सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका झाल्यात. या बैठकांदरम्यान, मनसे नेते वसंत मोरे आणि शरद पवार यांची भेट

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : मनसे नेते वसंत मोरे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य लढतीत शरद पवार सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका झाल्यात. या बैठकांदरम्यान, मनसे नेते वसंत मोरे आणि शरद पवार यांची भेट झाल्याने चर्चा सुरू झाल्यात. मात्र ही भेट राजकीय नसून खेळाच्या एका मैदानाच्या आरक्षणाबद्दलची होती असे कारण वसंत मोरे यांनी या भेटीवर भाष्य केले. पुर्वी राष्ट्रवादी एकच असताना आणि अजित पवार राष्ट्रवादीमध्ये असताना वसंत मोरे यांना पक्षात येण्याची थेट ऑफर दिली होती. दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे इच्छुक आहेत. मात्र शर्मिला ठाकरे यांनी आपल्या भाषणा साईनाथ बाबर यांचं नाव घेतल्याने वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 28, 2024 01:03 PM