फडणवीस-राज यांच्यात तासभर चर्चा, BMC साठी मोठी बैठक? ताज लँड्स एन्डच्या रूम 2101 मधील इनसाईड स्टोरी

फडणवीस-राज यांच्यात तासभर चर्चा, BMC साठी मोठी बैठक? ताज लँड्स एन्डच्या रूम 2101 मधील इनसाईड स्टोरी

| Updated on: Jun 12, 2025 | 1:29 PM

ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असताना आज मुंबईतील वांद्रयाच्या ताज लॅंड्स एन्ड हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात तासभर बैठक झाली.

महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे. अशातच मुंबई महापालिकेची निवडणूक यंदाही जास्त महत्त्वाची मानली जाते कारण या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलेलं आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका एवढं लक्ष वेधून घेण्याचं कारण नाहीतर यंदाची होणारी निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष यांच्या युतीची चर्चा सुरू असताना आज मुंबईत एक मोठी घडामोड घडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्रयाच्या ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये दाखल झाले. याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हजर होते. या हॉटेलच्या २१०१ नंबरच्या रूममध्ये दोघात बैठक झाली. बघा राज आणि फडणवीसांच्या बैठकीची इनसाईड स्टोरी काय?

Published on: Jun 12, 2025 01:28 PM