Central Railway Mega Block Video : मध्य रेल्वेचा ब्लॉक वाढवला…घरातून बाहेर पडण्यापूर्वी ‘हा’ व्हिडीओ बघाच…
मध्य रेल्वे मार्गावरून सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंतच सुरू आहेत. मुंबईतील मस्जिद बंदरजवळील कर्नाक पुलावर गर्डर घेण्यासाठी जो ब्लॉक घेण्यात आला होता, तो अद्याप रद्द करण्यात आलेला नाही.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ही मेगाब्लॉकमुळे दुसऱ्या दिवशीही खोळंबलेली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. आज पहाटे 5.30 पर्यंत हा ब्लॉक होता, मात्र गर्डर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्याने तिनही रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत असून रेल्वेसेवा उशिराने सुरू आहेत. तर मध्य रेल्वे मार्गावरून सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंतच सुरू आहेत. मुंबईतील मस्जिद बंदरजवळील कर्नाक पुलावर गर्डर घेण्यासाठी जो ब्लॉक घेण्यात आला होता, तो अद्याप रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे ब्लॉक वाढवण्यात आला आहे. मस्जिद बंदरजवळील कर्नाक पुलाचं काम रात्रीपासून सुरू आहे. मात्र अद्याप गर्डर बसवण्याचं काम पूर्ण झालं नसल्याने हा ब्लॉक वाढवण्यात आला आहे. दरम्यान, गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळतेय. ब्लॉक वाढवण्यात आल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. काही लोकल मध्येच थांबल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. बघा यासंदर्भातील व्हिडीओ…
