सर्व जिल्हा परिषदांमधील ‘या’ पदांसाठी तब्बल १९ हजाराहून अधिक पदांची जम्बो भरती, गिरीश महाजन म्हणाले…

| Updated on: Aug 05, 2023 | 8:13 AM

VIDEO | सर्व जिल्हा परिषदांमध्ये जम्बो भरती होणार, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा, कुठे आणि कोणत्या पदांवर होणार भरती?

Follow us on

मुंबई, ५ ऑगस्ट, २०२३ | ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट- क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील १०० टक्के व इतर विभागाकडील ८० टक्के रिक्त पजे सरळसेवेने भरण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गातील एकूण १९,४६० इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात ०५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मार्च, २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमी व इतर विविध कारणांमुळे परिक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत हि मेगा भरती करण्यात येत आहे.