Mehboob shaikh : ज्याने मार खाल्ला.. ; राड्यावर मेहबूब शेख भडकले
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांनी विधान भवनात झालेल्या राड्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबुब शेख आझाद मैदान पोलीस स्थानकात पोहचले आहेत. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली असून काही वेळात कोर्टात हजर केल जाईल. यावर बोलताना मेहबूब शेख म्हणाले की, आम्हाला नितीन देशमुख कुठे आहेत हे सांगायाल तयार नाहीत. तो काय कसाब आहे का? आरोपींनी व्हिआयपी ट्रिटमेन्ट देत होते. नितीन देशमुखांची फिर्याद घेऊन पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायाला हवे होते. नितीनच काही दिवसापूर्वी ऑपेरेशन केल होत काल कारवाई केली म्हणून तब्येतीची विचारपूस करायला मरीन ड्रायव्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत भेटायला आलो. तर आम्हाला पोलीस भेटू देत नाहीत. नितीन कुठं आहे सांगत नाहीत हे कोणते नियम? असा संतप्त सवाल यावेळी शेख यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी पुढे बोलताना मेहबूब शेख यांनी म्हंटलं की, नितीनची फिर्यादी घेण्याऐवजी नितीनवर कारवाई केली आहे. काल तर विधानभवनात पडळकरच्या कार्यकर्त्याला पोलीस गायछाप मळून देत होता ही कोणती पद्धत? सर्वांच्या कॅमेरात व्हिडीओ आहेत. अध्यक्ष म्हटले समज देतो आणि सोडतो पण नितीनवरच कारवाई झाली. ज्याने कुत्र्यासारखा मार खाल्ला त्याच्यावर गुन्हे दाखल केले, ही कोणती पद्धत आहे? अशी आक्रमक भूमिका यावेळी मेहबूब शेख यांनी मांडली.
