… तर मी माझी दाढी काढून टाकणार! इम्तियाज जलील यांचं मोठं चॅलेंज

| Updated on: Jan 13, 2026 | 12:43 PM

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार सभा घेतली. यावेळी बोलताना जलील यांनी भाषणात अनेक मुद्दे मांडले आणि विरोधकांवर तीव्र टीका केली.

छत्रपती संभाजीनगर येथील चंपा चौक येथे एमआयएम प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक जोरदार सभा घेतली. यावेळी बोलताना जलील यांनी भाषणात अनेक मुद्दे मांडले आणि विरोधकांवर तीव्र टीका केली.

जलील म्हणाले की, पक्षातील काही लोक तिकीट न मिळाल्याने नाराज झाले आणि झेंडा फेकून दिला. तर काही कट्टर समर्थक आहेत. लोक एका रात्रीत पक्ष बदलतात, म्हणून सरडाही लाजतो, असं म्हणत त्यांनी टोला लगावला. विरोधकांच्या जीभेमागे भुमरे, सावे आणि शिरसाट दिसतात, असा आरोप करत ते म्हणाले की, आम्ही बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला अडचण होईल. आम्ही हजारो शत्रूंशी लढू शकतो, पण आपल्यातील लोकांशी नाही.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MIM चा साफसफाई करण्याची भाषा केली होती. त्यावर इम्तियाज जलील यांनी आव्हान दिले असून संभाजीनगरातून आमचा सुपडा साफ झाला तर मी माझी दाढी काढून टाकीन, नाही तर तुम्ही तुमची दाढी काढा! असं थेट चॅलेंजच त्यांनी शिंदेंना दिलं आहे.

 

Published on: Jan 13, 2026 12:43 PM