‘स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व…’,आदित्य यांना महाजन यांचा टोला
छत्रपती संभाजीनगरात आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आजोबा स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे कारच्या बोनेटवर उभे राहून भाषण केले आहे. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगरात आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे जीपच्या बोनेटवर उभे राहून भाषण केले आहे. या संदर्भात भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आदित्य ठाकरे यांना स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व आणि विचार तसे असावे लागते असा टोला लगावला आहे. भाजपातील कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत तिकीट न मिळाल्याने पक्षातून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांचा प्रचार करणार असा इशारा दिला होता. यावर पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात येईल असे महाजन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले ते संधीसाधूपणातून आले आहेत. त्यांच्या भाषणांना गर्दी होते पण मते मिळत नाहीत. उद्धव ठाकरे आमच्या सोबत एकत्र लढले आणि नंतर काँग्रेस सोबत गेले हे यांचे विचार आहेत. कोरोनाकाळात मंत्रालयाची पायरी चढले नाहीत असा मुख्यमंत्री कधी पाहिला आहे काय ? असाही सवाल महाजन यांनी केला.
