Yogesh Kadam News : ‘हात पुढे कराल आणि भविष्यात..’, योगेश कदम यांचा राज ठाकरेंना आपुलकीचा सल्ला

Yogesh Kadam News : ‘हात पुढे कराल आणि भविष्यात..’, योगेश कदम यांचा राज ठाकरेंना आपुलकीचा सल्ला

| Updated on: Apr 21, 2025 | 7:33 AM

Yogesh Kadam Tweet To Raj Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर मंत्री योगेश कदम यांनी ट्विट करून राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

हात पुढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील, असा सल्ला मंत्री योगेश कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना योगेश कदम यांनी ट्विट करत हा सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये योगेश कदम यांनी म्हंटलं आहे की, राज ठाकरे यांना एक आपुलकीचा सल्ला ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नातीसुद्धा नकोशी होतात. याचाच प्रत्यय खुद्द राज ठाकरेंना देखील आहे. त्यामुळे आपुलकीचा सल्ला देतो. जरा जपून, आपण हात पुढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील, असं मंत्री कदम यांनी या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

Published on: Apr 21, 2025 07:33 AM