Mira Bhayandar Leopard : मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला धिप्पाड बिबट्या अखेर जेरबंद, 7 जणांवर हल्ला अन्..

Mira Bhayandar Leopard : मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला धिप्पाड बिबट्या अखेर जेरबंद, 7 जणांवर हल्ला अन्..

| Updated on: Dec 19, 2025 | 4:16 PM

मीरा भाईंदर येथील दाट लोकवस्तीच्या परिसरात शिरलेल्या बिबट्याला अखेर सुमारे सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाने जेरबंद केले. या बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू असून, यात एका गंभीर जखमी मुलीच्या उपचाराची जबाबदारी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.

मीरा भाईंदर येथे दाट लोकवस्तीच्या इमारतींमध्ये शिरलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने सुमारे सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद केले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात सकाळी भीतीचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार, मीरा भाईंदरमधील एका इमारतीच्या परिसरात बिबट्या शिरल्याचे सकाळी निदर्शनास आले. वनविभाग आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले आणि जाळ्यात पकडण्यात यश आले. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमींच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याला बोरीवली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे. बिबट्या मानवी वस्तीत कसा आला, याचा शोध घेतला जाईल असे सरनाईक यांनी सांगितले.

Published on: Dec 19, 2025 04:16 PM