Santosh Bangar : जिथं ऑफिस तिथं चुरा करू… हात-पाय सलामत ठेवायचेत तर… बांगरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Santosh Bangar : जिथं ऑफिस तिथं चुरा करू… हात-पाय सलामत ठेवायचेत तर… बांगरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Oct 04, 2025 | 1:36 PM

आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींमधील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. शेतकऱ्यांचे हित न पाहिल्यास कंपनीच्या कार्यालयांची तोडफोड करण्याचा आणि कर्मचाऱ्यांना हिंडू न देण्याचा इशारा बांगर यांनी दिला आहे.

आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींमधील एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये आमदार बांगर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा कंपनीला थेट इशारा दिला आहे. पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः, १५ ऑगस्टपूर्वी निवडलेल्या पीक कापणी कार्यक्रमाच्या गावांबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. डोंगरभागावरील गावे निवडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

बांगर यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना वस्तुस्थितीनुसार सर्वेक्षण करण्याची विनंती केली. तसेच, कंपनीचे हित न पाहता शेतकऱ्यांचे हित पाहण्याचे आवाहन केले. जर यात काही कमी-जास्त झाले, तर हिंगोलीतील कंपनीच्या कार्यालयांची तोडफोड करू आणि कर्मचाऱ्यांना हिंडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही, तर हातपाय सलामत राहणार नाहीत, असेही बांगर यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 04, 2025 12:27 PM