Suresh Dhas News : त्याचा बॉस मीच, म्हणून मीच त्याच्यावर.., सतीश भोसलेच्या ‘त्या’ व्हिडिओवर धसांची प्रतिक्रिया

Suresh Dhas News : त्याचा बॉस मीच, म्हणून मीच त्याच्यावर.., सतीश भोसलेच्या ‘त्या’ व्हिडिओवर धसांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 06, 2025 | 1:09 PM

शिरूरमधील मारहाण प्रकरणात समोर आलेल्या व्हिडओमध्ये असलेल्या सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचे अजून काही व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. त्यावर आज सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सतीश भोसलेला मी ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. पण तो पाठिमागे असे काही उद्योग करतो हे थोडीच मला माहिती आहे, असं आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या शिरूरमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर अल आहे. यात आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया द्यावी असि मागणी अंजली दमानिया यांच्यासह विरोधकांकडून केली आहे. त्यातवर आज धस यांनी प्रतिक्रिया देताना सतीश भोसलेवर कारवाईची मागणी केली आहे.

शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी अगोदर हे सांगू इच्छितो की, हा व्हायरल होणारा व्हिडीओ आताचा नाही तर दीड वर्षे जुना आहे. तो बॉस समजतो म्हणून काय झाले. मीच बॉस सांगतो त्याच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे असं सांगत महिलेच्या छेडछाडीवरून ही घटना घडल्याची माहिती मिळाल्याचे सुरेश धस यांनी म्हटले.

Published on: Mar 06, 2025 01:09 PM