Yashomati Thakur LIVE | अनाथ बालकांना नोकरी, शिक्षणात आरक्षण : मंत्री यशोमती ठाकूर लाईव्ह

Yashomati Thakur LIVE | अनाथ बालकांना नोकरी, शिक्षणात आरक्षण : मंत्री यशोमती ठाकूर लाईव्ह

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 7:50 PM

आजच्या या निकालामुळे 2018 पासूनच्या परीक्षा दिलेल्या सगळ्यांना 1 टक्के आरक्षण मिळेल. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकार महिला वसतीगृह सुरु करत होतो. आता राज्य सरकारचा वसतीगृहात सहभाग असणार आहे.

मुंबई : 2018 मध्ये सरकारने अनाथ मुलांना एक टक्के आरक्षण दिले होते. पण त्याबाबतच्या जीआरमध्ये काही चुका होत्या. त्यामुळे अनेक मुलांना आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे अ, ब, क असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. अ म्हणजे अनात मुलं आहेत. ब मध्ये त्यांचे आई-वडील नाहीत. पण त्यांचे नातेवाईक त्यांना बालगृहात भेटायाला आले आहेत. तर क गटात त्यांचे जे मुलं नातेवाईकांसोबत बालगृहात राहीले आहेत. आजच्या या निकालामुळे 2018 पासूनच्या परीक्षा दिलेल्या सगळ्यांना 1 टक्के आरक्षण मिळेल. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकार महिला वसतीगृह सुरु करत होतो. आता राज्य सरकारचा वसतीगृहात सहभाग असणार आहे. सामाजिक संस्था 25 टक्के राज्यचा 15 तर केंद्र सरकारचा 60 सहभाग राहील. एकूण 50 वर्किंग वूमेन वसतीगृह बांधण्याचा विचार आहे. मुंबईत 4, उपनगरात 6 तर ठाण्यात 4 वसतीगृह बांधत आहोत. महिलांना भाड्यासाठी पैसे दिले जातील. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हॉस्टेल असेल, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.