Raj Thackeray : ए पिल्लू… काय झालं.. पत्रकार परिषद सुरू अन् लाडक्या कुत्र्याची एन्ट्री, राज ठाकरेंनी नावंही सांगितलं
राज ठाकरे त्यांच्या कुत्र्यांची काळजी घेताना किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. आजही पुन्हा त्यांचे मुक्या प्राण्यांवरील प्रेम पाहायला मिळालंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरे यांच्या घरात एकाहून अधिक कुत्रे असल्याचे त्यांनी आपल्या बोलण्यातून एकदा सांगितले होते. राज ठाकरे यांच्या घरातील सर्वच श्वानांना ते आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करताना बऱ्याचदा पाहायला मिळालंय. इतकंच नाहीतर ठाकरे परिवारातील इतर सदस्यांनाही कुत्र्यांविषयी जिव्हाळा असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मुक्या प्राण्यांवरील त्यांच्या या प्रेमामुळे राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा आणि संवेदनशील पैलू नेहमीच प्रकर्षाणे जाणवतो. अशातच आज पुन्हा एकदा लाईव्ह राज ठाकरे यांचं श्वानप्रेम पाहायला मिळालं. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर राज ठाकरे गेले होते. या भेटीनंतर राज ठाकरे शिवतीर्थावर येताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषद सुरू असताना राज ठाकरेंचा लाडका कुत्रा मध्येच आल्याचे पाहायला मिळालं.. बघा व्हिडीओ पुढे काय झालं…
