Mumbai | दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्या; मनसेची हायकोर्टात हस्तक्षेप याचिका

| Updated on: Aug 04, 2021 | 7:19 PM

मुंबई लोकल  प्रवासाबाबत मनसेने  उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे.

Follow us on

मुंबई लोकल  प्रवासाबाबत मनसेने  उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मनसेने हस्तक्षेप याचिका दाखल करुन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाची लावून धरली आहे. या याचिकेवर आता उद्या 5 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. मनसेने आपल्या याचिकेत दोन लस घेतलेल्या सर्वांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावर आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.