“भाजपचा हौसला सध्या…”, अमित ठाकरे थेट विधानपरिषदेतून आमदार? मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं…
सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत. यानंतर आता भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. यानंतर आता भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत. यानंतर आता भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावरच मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करावं की नाही, याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेतील. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य असेल. कारण हा इतका उच्च पातळीवरचा विषय आहे. त्यामुळे हा निर्णय सामान्य कार्यकर्त्याशी चर्चा करुन घेतला जाणार नाही. राज ठाकरेंना जे काही योग्य वाटेल ते करतील”, असे प्रकाश महाजन म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, “मला भाजपकडून असा काही प्रस्ताव आलाय का, याबद्दल माहिती नाही. कारण दिल्लीच्या विजयामुळे भाजपचा हौसला सध्या बुलंद झाला आहे. त्यामुळे त्यांना आता नवीन मित्र जोडायचे की आहे ते मित्र तोडायचे, याबद्दल सध्या गोंधळाची स्थिती आहे”, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.
