Santosh Dhuri : …म्हणून भाजपात प्रवेश, कट्टर मनसैनिक संतोष धुरी भाजपात अन् मनसेला मोठा धक्का

Santosh Dhuri : …म्हणून भाजपात प्रवेश, कट्टर मनसैनिक संतोष धुरी भाजपात अन् मनसेला मोठा धक्का

| Updated on: Jan 06, 2026 | 4:23 PM

मनसे नेते संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुत्वासाठी केसेस अंगावर घेतल्यानंतरही आपल्याला आणि अन्य कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे ते म्हणाले. युतीसाठी मनसेने मोठे मन दाखवले, मात्र उद्धव ठाकरेंनी ६ नगरसेवक पळवून अनेकांना तिकिटापासून वंचित ठेवले, असा आरोप धुरी यांनी केला.

मनसे नेते संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हिंदुत्वासाठी केलेल्या आंदोलनांमध्ये गुन्हे अंगावर घेऊनही आपल्याला व पक्षाच्या अन्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे धुरी यांनी म्हटले आहे. आघाडी सरकारने आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळपास दीड महिना राज्याबाहेर राहावे लागले, तरीही ते विसरून राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी युती केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मोठेपणा न दाखवता मनसेचे ६ नगरसेवक पळवले, असा आरोप धुरी यांनी केला. धुरी यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारून त्यांना बाजूला केले. यात अनिजा माजगावकर आणि राहुल चव्हाण यांसारख्या नावांचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जसे छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना दूर केले गेले, त्याचप्रमाणे आता निष्ठावंतांना बाजूला केले जात आहे, अशा भावना धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर व्यक्त केल्या.

Published on: Jan 06, 2026 04:23 PM