हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर ‘पाणीदूत’ आदिवासी महिलांच्या हाकेला धावला

| Updated on: Apr 15, 2024 | 2:19 PM

आदिवासी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेने फक्त पाईपलाईन केली मात्र वर्ष उलटून गेले तरीही या पाईपलाईनला पाणी आलेच नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांना मदतीची हाक दिली होती. दरम्यान, tv9च्या बातमीनंतर आदिवासी पाड्यांवर मनोज चव्हाण हे पोहोचले

Follow us on

इगतपुरी येथील नगर परिषद हद्दीतील वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती शिवारातील आदिवासी पाड्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. इगतपुरी नगर परिषद हद्दीतील तीन आदिवासी वाड्यातील महिलांना लहान लेकर सोबत घेऊन निसरड्या पायवाटेने दरीत उतरून गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागतेय. डोंगर दऱ्यातून एका हाताने आपल्या लहान लेकराला धरत दुसऱ्या हाताने डोक्यावरील हंडा सांभाळत हे पाणी आणावे लागत आहे. थोडाही अंदाज चुकला तर थेट दरीत कोसळण्याची शक्यता त्यातच जंगली प्राण्यांचे भय मागील वर्षी येथील आदिवासी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेने फक्त पाईपलाईन केली मात्र वर्ष उलटून गेले तरीही या पाईपलाईनला पाणी आलेच नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांना मदतीची हाक दिली होती. दरम्यान, tv9च्या बातमीनंतर आदिवासी पाड्यांवर मनोज चव्हाण हे पोहोचले आहेत. मनसेचे पाणीदूत म्हणून ओळख असलेले मनोज चव्हाण यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे. आदिवासी बांधवांना डोंगर दऱ्यतून जीव मुठीत घेऊन गढूळ झिऱ्यातील पाण्याने तहान भागवावी लागत होती त्यामुळे ते स्वतः टँकर घेऊन आदिवासी पाड्यांवर पोहचले इतकंच नाहीतर पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तर पाणी मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना यावेळी पाहायला मिळाली.