Uran MNS BJP Clash : भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
उरणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकारी सतीश पाटील यांना मारहाण केल्याची घटना घडली. स्थानिक निवडणुकांमधील टीकेवरून ही मारहाण झाली.
यात उरण येथे भाजप पदाधिकाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना चर्चेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी भाजप आमदार महेश बालदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून हा प्रकार घडला. मनसे पदाधिकारी सतीश पाटील यांना भाजपच्या सुमारे १५० ते २०० पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाणीवेळी सतीश पाटील यांच्या आईही त्यांच्यासोबत होत्या. सतीश पाटील यांना आमदार बालदी यांची माफी मागण्यास भाग पाडले गेले आणि माफीचा व्हिडिओ बनवायलाही लावला, असा आरोप आहे. या प्रकरणी मनसेने उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सतीश पाटील यांनी सांगितले की, त्यांनी भूमिपुत्रांसाठी आवाज उठवला होता, ज्याचा राग धरून त्यांना मारहाण करण्यात आली.
Published on: Dec 06, 2025 09:21 PM
