MNS : पक्षातच इज्जत नसेल तर… मनसेच्या प्रकाश महाजनांकडून मनातील खदखद व्यक्त, डोळ्यात पाणी अन्…
दोन भावांची युती व्हावी ही जनभावना बोलून दाखवणे गुन्हा आहे का? असा सवाल करत मनसेच्या प्रकाश महाजनांची नाराजी बाहेर पडली आहे. मनसेच्या पक्ष शिबिरामध्ये त्यांना आमंत्रणही देण्यात आलं नाही. त्यामुळे भावनिक होत त्यांनी पक्षाच्या कारभारावरच बोट ठेवलं आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र यावेत ही जनभावना बोललो तर काय वाईट केलं? भाजपच्या राणे यांची पंगा घेतल्यावर पक्षाने साथ दिली नाही तेही दुःख विसरलो. पक्षातच इज्जत नसेल तर करायचं तरी काय? मनसेच्या प्रवक्ते पदाची धुरा नेटाने सांभाळणाऱ्या प्रकाश महाजनांच्या भावनांचा अखेर उद्रेक झाला आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वात नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेच राज्यस्तरीय शिबीर सुरु आहे. मात्र त्याचं निमंत्रणच न दिल्यानं भावनिक होत प्रकाश महाजनांच्या मनातील खंत बाहेर पडली आहे. यातला सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत ही जनभावना मी बोललो तर त्यात काय वाईट हा प्रश्न महाजनांनी मनसेलाच विचारला आहे. राज ठाकरे यांनी साधी मराठीसाठी एकीची साथ घालून आता तेव्हाच तेव्हा बघू असं म्हणून सावध भूमिका घेतली आहे. मात्र त्यावरून मनसेत संभ्रम आणि नाराजी असल्याचं समोर येत आहे.
