मनसेचं पुणे लोकसभेचं तिकीट साईनाथ बाबरांना? शर्मिला ठाकरे यांच्या सूचक वक्तव्याची जोरदार चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या उमेदवारीवरून सूचक वक्तव्य केलंय. पुण्यातील मनसेच्या एका कार्यक्रमातून शर्मिला ठाकरे यांनी पुणे लोकसभा निवडणुकीचे तिकीट साईनाथ बाबार यांनी मिळेल, असे संकेत दिलेत.
पुणे, ७ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर इच्छुक आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या उमेदवारीवरून सूचक वक्तव्य केलंय. पुण्यातील मनसेच्या एका कार्यक्रमातून शर्मिला ठाकरे यांनी पुणे लोकसभा निवडणुकीचे तिकीट साईनाथ बाबार यांनी मिळेल, असे संकेत दिलेत. साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती बाबर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे जे बोलल्या त्याची पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. साईनाथ बाबर यांना महापालिकेत नाहीतर वरच्या सभागृहात पाठवा, दिल्लीला पाठवला तर दुधात साखऱ…असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. पुण्यात मनसेचे डॅशिंग उमेदवार अशी ओळख असलेले नेते वसंत मोरे हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र शर्मिला ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणेच साईनाथ बाबर यांना उमेदवारी मिळेल असे संकेत दिलेत.
