Raj Thackeray : मला संजय राऊतांचा फोना आला अन्… राज ठाकरेंनी सारं काही सांगितलं
5 जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र होणारा मोर्चा रद्द झाल्यानंतर त्याऐवजी विजयी सभा होणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले.
५ जुलैला विजयी मेळावा होणार पण तो कोणताही पक्षाचा नसेल, अशी मोठी घोषणा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. ते असं म्हणाले, ‘तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजय मिळाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. युती आघाड्या या सगळ्या गोष्टी निवडणुका या गोष्टी येत जातील. सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली तर परत येणार नाही. कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या ती जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्याला काय अर्थ आहे?’, असं राज ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी असंही सांगितलं की, GR रद्द झाला त्याचा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे… आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल. ते म्हणाले आपण एक विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. मी म्हटले घेऊया.. मला त्यांनी सांगितलं पाच तारखेला आपण जाहीर केले तर पाच तारखेला घेऊया का? मी म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलेन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवूया’, असं राज ठाकरे म्हणाले.
