बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मनसेचा मोठा निर्णय, शिवाजी पार्कातील रोषणाई…

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मनसेचा मोठा निर्णय, शिवाजी पार्कातील रोषणाई…

| Updated on: Nov 17, 2023 | 2:35 PM

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचं निधन झालं. या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक दाखल होताना दिसत आहेत. अशातच मनसेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचं निधन झालं. या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक दाखल होताना दिसत आहेत. अशातच मनसेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कातील विद्युत रोषणाई आज बंद ठेवण्यात येणार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे. तर फक्त आजच्या दिवस ही विद्युत रोषणाई बंद ठेवण्यात येणार असून उद्यापासून २६ नोव्हेंबरपर्यंत ही विद्युत रोषणाई सुरू असणार आहे. दरवर्षी शिवाजीपार्क येथे दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. तर यंदा या दीपोत्सवाचं अकरावं वर्ष आहे, दरवर्षी प्रथेप्रमाणे वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते ‘वसुबारस’च्या दिवशी या सोहळ्याची सुरुवात होते. यंदा प्रसिद्ध पटकथा लेखक जोडी ‘सलीम आणि जावेद’ या दोघांच्या हस्ते दीपोत्सवाची सुरुवात झाली.

Published on: Nov 17, 2023 02:27 PM