Raj Thackeray : ‘मी आयत्या पिठावर रेघोट्या…’,  राज ठाकरे यांचं युती आणि शिवसेनेच्या फुटीवर मोठं वक्तव्य

Raj Thackeray : ‘मी आयत्या पिठावर रेघोट्या…’, राज ठाकरे यांचं युती आणि शिवसेनेच्या फुटीवर मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 19, 2025 | 1:56 PM

एकत्र येणं हे माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण महाराष्ट्रासाठी लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या एका युट्यूब चॅनलला नुकतीच मुलाखत दिली. यामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव दिल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, ‘आमच्यातील वाद, भांडणं छोटी आहेत. पण महाराष्ट्र खूप मोठा आहे. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे.’, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना केला. यावर राज ठाकरे स्पष्टच म्हणाले, ‘या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट काही नाही’. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व राजकीय नेत्यांनी मिळून एकच पक्ष काढावा, असं मिश्कील भाष्य देखील केलं. बघा राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं?

Published on: Apr 19, 2025 01:56 PM