Raj Thackeray : कोण जैन लोकं? जे कबुतरांवर बसून फिरायला जातात! राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray : कोण जैन लोकं? जे कबुतरांवर बसून फिरायला जातात! राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 21, 2025 | 1:19 PM

'रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाचे आहेत. तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नव्हता. ते विषय भरकटवतात.'

वराह जयंतीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाद सुरू असल्याचे दिसते. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती राज्यात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाहीतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यावर राज ठाकरे यांना सवाल केला असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘असे विषय आले तर दाखवू नका. वादच होणार नाहीत. पण तुम्ही करणार नाही. ज्यांना वाद घडवायचे आहेत. त्यांना महत्त्व दिलं नाही तर वाद होणारच नाही. या गोष्टी जाणूनबुजून केल्या जातात.’, असं राज ठाकरे म्हणाले. तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरखान्यासंदर्भातील वादावर भाष्य करताना राज ठाकरे महणाले, तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही. गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. असे कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात, असं म्हणत त्यांनी खोचक भाष्य केलं. तर पुढे राज ठाकरे असंही म्हणाले, काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात.

Published on: Aug 21, 2025 12:41 PM