Raj Thackeray : दत्तक घेतो म्हटल्यावर हा ‘बाप’ परत फिरकलाच नाही, नाशकात राज ठाकरे यांचा रोख नेमका कुणावर?

Raj Thackeray : दत्तक घेतो म्हटल्यावर हा ‘बाप’ परत फिरकलाच नाही, नाशकात राज ठाकरे यांचा रोख नेमका कुणावर?

| Updated on: Jan 09, 2026 | 8:47 PM

राज ठाकरेंनी नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या शहर दत्तक घेण्याच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फडणवीस परत फिरकलेच नाहीत, असे ते म्हणाले. २०१२ च्या कुंभमेळ्याची यशस्वी व्यवस्था आणि सध्याच्या झाडतोडीच्या घडामोडींचा संदर्भ देत, ठाकरेंनी तपोवनातील जमीन उद्योजकांच्या घशात घालण्याचा आरोपही केला.

राज ठाकरेंनी नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. २०१७ मध्ये फडणवीसांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर ते परत फिरकलेच नाहीत, असा आरोप राज ठाकरेंनी केला. नाशिककर या आश्वासनांना भुलले आणि मनसेने केलेल्या कामांना विसरले, असेही ते म्हणाले. ठाकरेंनी २०१२ च्या कुंभमेळ्याची आठवण करून दिली. त्यावेळी एकही झाड न तोडता यशस्वी कुंभमेळा पार पडला होता आणि प्रशासकांचा सन्मानही झाला होता. मात्र आता तपोवनात झाडे का तोडली जात आहेत, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही झाडतोड केवळ कुंभमेळ्यासाठी नसून, उद्योजकांसाठी जमीन मोकळी करण्याचा हा कट असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी ताशेरे ओढले.

Published on: Jan 09, 2026 08:47 PM