Raj Thackeray : ‘शिवतीर्थ’बाहेर पत्रकारांना राज ठाकरेंनी जवळ बोलवलं अन् घेतली फिरकी म्हणाले… बघा व्हिडीओ

Raj Thackeray : ‘शिवतीर्थ’बाहेर पत्रकारांना राज ठाकरेंनी जवळ बोलवलं अन् घेतली फिरकी म्हणाले… बघा व्हिडीओ

| Updated on: Jun 07, 2025 | 4:07 PM

दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज राज ठाकरे यांनी मात्र पत्रकारांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ नेमकं काय घडलं?

सध्या सगळीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार अशी चर्चा आहे. तर उद्धव ठाकरेंकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया आली. अशातच राज ठाकरेंनी पत्रकारांची फिरकी घेतल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर आपली गाडी निघाल्यानंतर समोरच उभ्या असलेल्या पत्रकारांना राज ठाकरेंनी आवाज दिला आणि त्यांची फिरकी घेतली. शिवतीर्थाबाहेर गाडी पडताच राज ठाकरेंनी पत्रकारांना आवाज दिला आणि त्यांना जवळ बोलवून घेतलं. राज ठाकरेंनी बोलवताच पत्रकारा राज ठाकरेंच्या गाडीजवळ गेलेत आणि यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना कुठे दौरा? असा सवाल केला. यानंतर मातोश्रीवर चाललोय असं म्हणत पत्रकारांना उत्तर देत त्यांनी गंमतीशीरपणे वक्तव्य केलंय. यानंतर सर्वच पत्रकार हसायला लागले. बघा व्हिडीओ नेमकं काय घडलं?

Published on: Jun 07, 2025 04:07 PM