Raj Thackeray : फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं ओपन चॅलेंज काय? उद्धव ठाकरेंच्या दिशेनं ‘इंजिन’?

Raj Thackeray : फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं ओपन चॅलेंज काय? उद्धव ठाकरेंच्या दिशेनं ‘इंजिन’?

| Updated on: Jul 20, 2025 | 11:33 AM

जवळपास वर्षभरापासून राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या विरोधात ते बोललेच नाहीयेत. पाच जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात सुद्धा त्यांनी फडणवीसांवर टीका केली नाहीये. पण मीरा रोडच्या सभेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर फक्त फडणवीसच होते. ठाकरे बंधूंच्या या युतीचं इंजिन ट्रॅकवर येतंय का?

मीरा रोडच्या सभेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर फक्त आणि फक्त मुख्यमंत्री फडणवीस होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच राज ठाकरे फडणवीसांना चॅलेंज देऊन टीका करत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना राज ठाकरेंचही इंजिन उद्धव ठाकरेंच्या दिशेने वळतंय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीसांसोबत आतून मिळालेले आहेत असं विष जनतेच्या मनामध्ये कालवले जातंय. हे उघडपणे सांगून राज ठाकरेंनी फडणवीसांसोबत आपला राजकीय संबंध नाही हेही स्पष्ट केलं. फडणवीसांची स्क्रिप्ट वैगरे काही नाही हे राज ठाकरे सांगत असले तरी कॉंग्रेसला यामागे फडणवीसांचं प्लॅनिंग वाटतंय. राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये सभा झाली त्याच्या काही तास आधी विधानभवनात पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईची निवडणूक घोषित झाल्यावर राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा करणार असं म्हटलेलं आहे. म्हणजेच राज ठाकरे सोबत युती होणार हे उद्धव ठाकरे वारंवार सूचित करत आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 20, 2025 11:33 AM