पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध, काय म्हणाल्या शालिनी ठाकरे?

| Updated on: Apr 24, 2024 | 11:57 AM

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय निरूपम आणि रवींद्र वायकर यांची नावं चर्चेत आहेत. मात्र शिंदेंच्या संभाव्य उमेदवारीवरून मनसेकडून उघड विरोध करण्यात आलाय. राज ठाकरेंनी सक्षम नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. पण...

Follow us on

राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. पण शिंदेंच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजय निरूपम आणि रवींद्र वायकर यांना मनसेने विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्रदोही आणि भ्रष्टाचाऱ्यांनी मनसेचा पाठिंबा गृहित धरू नये, असा इशाराच शालिनी ठाकरे यांनी दिलाय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय निरूपम आणि रवींद्र वायकर यांची नावं चर्चेत आहेत. मात्र शिंदेंच्या संभाव्य उमेदवारीवरून मनसेकडून उघड विरोध करण्यात आलाय. राज ठाकरेंनी सक्षम नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. पण महाराष्ट्राद्रोही संजय निरूपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर यांना मनसैनिकांचा पाठिंबा गृहित धरू नये, असा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिला. ‘मनसेला ‘धनुष्य बाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे’, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हणत शिंदे गटाला टोला लगावला आहे.